भुसावळात उद्या नागरीकता संशोधन कायदा समर्थनार्थ मोर्चा


भुसावळ : भारतीय नागरीकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ मंगळवार, 24 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री अष्टभुजा माता मंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहे. राष्ट्रहिताच्या उपक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय नागरिक मंचतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात रविवारी सायंकाळी शहरातील विविध संघटनांच्या प्रमुखांची बैठक झाली यात हा निर्णय घेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सर्व राष्ट्रप्रेमी नागरीक करणार आहेत. या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे तसेच पद, समाज व राजकारण बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.