स्व.निखील खडसे यांना जयंतीनिमित्त मुक्ताईनगरात अभिवादन


Greetings to Mr. Nikhil Khadse on his birth anniversary in Muktainagar मुक्ताईनगर : जिल्हा परीषदेचे माजी सदस्य व आदिशक्ती मुक्ताई सह सुतगिरणीचे चेअरमन स्व.निखील एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्ताने स्व.निखील खडसे स्मृतीस्थळावर आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे, क्रिशिका खडसे, गुरुनाथ खडसे यांच्या हस्ते स्व.निखील खडसे यांच्याहस्ते पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले.

विनम्र व्यक्तीमत्व हरपले
ईश्वर रहाणे म्हणाले की, स्व.निखील खडसे हे मनमिळाऊ आणि विनम्र व्यक्तिमत्त्व होते. जिल्हा परीषद सदस्य असताना त्यांच्याकडे कुठलाही व्यक्ती कोणतेही काम घेऊन गेला तरी ते त्या व्यक्तीला मदत करायचे. विरोधी पक्षातील व्यक्ती जरी त्यांच्याकडे काम घेऊन गेला तरी त्यांनी कधी काम करायला नकार दिला नाही परंतु काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. स्व.निखील हे मुक्ताई सूतगिरणीचे चेअरमन असताना त्यांच्या कार्यकाळात सूतगिरणीच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. स्थानिक लोकांना महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे स्वप्न होते मात्र त्यांच्या पश्चात रोहिणी ताईंनी हे स्वप्न पुर्ण केले.

यांची अभिवादन सभेला उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, निवृत्ती पाटील, निलेश पाटील, कैलास सरोदे, विकास पाटील, दीपक पाटील, विलास धायडे, राजेंद्र माळी, रामदास पाटील, कैलास चौधरी, भागवत टिकारे, प्रदीप बडगुजर, विजय चौधरी, किरण वंजारी, प्रमोद शेळके, दीपक वाणी, प्रदीप साळुंखे, अतुल पाटील, रामभाऊ पाटील, प्रवीण पाटील, बापू ससाणे, विनोद सोनवणे, रणजीत गोयंका, नंदकिशोर हिरोळे, शिवा पाटील, विकास पाटील, श्रीराम चौधरी, सुभाष घटे, बाळा भालशंकर, दीपक साळुंखे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !