जळगावात बंद घर चोरट्यांना पर्वणी : 70 हजारांचा ऐवज चोरीला


In Jalgaon, closed house burglars were arrested: 70,000 was stolen जळगाव : शहरातील ओमशांतील नगरात बंद घरातून चोरट्यांनी रोकडसह मुद्देमाल मिळून 70 हजारांचा ऐजव लांबवला. या प्रकरणी शुक्रवार, 30 डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
विजय रामदास तायडे (ओमशांती नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 25 डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून प्रयागराज येथे शालकाकडे गेले होते. बंद घर असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कोयंडा तोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण 70 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विजय तायडे हे गुरूवारी सकाळी 5.30 वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे उघडकीला आले.



रामानंदनगर पोलिसात गुन्हा
घरातील दोन्ही कपाट उघडे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. याबाबत रामांनदनगर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. शुक्रवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता रामानंदनगर पोलिसात विजय तायडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !