वडगाव शिवारात केळीचे घड कापल्याच्या निषेधार्थ मोठा वाघोद्यात शेतकर्‍यांचा रास्ता रोको


Farmers Blocked the way in Vadgaon Shiwar to protest against the cutting of bunches of Bananas  सावदा : चिनावल-वडगाव शिवारातील शेतकर्‍यांची केळी खोडे कापल्याने संतप्त झालेल्या शेतकरी मोठा वाघोदा येथील रावेर अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली. आंदोलनास्थळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांची कैफियत जाणून घेतली. वारंवार रावेर तालुक्यातील अनेक गावांत केळी खोड कापून शेतकर्‍यांचे नुकसान करण्याच्या घटना वाढल्या असून शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले जात असल्याने दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.

यांची आंदोलनस्थळी धाव
आंदोलनस्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे, उपनिरीक्षक अन्वर तडवी, फैजपूरचे सहा.निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, निंभोरा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस कर्मचारी, तीन दंगा नियंत्रक पथक दाखल झाले. दरम्यान आमदार शिरीष चौधरी यांनी नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी करीत शेतकर्‍यांची कैफियत ऐकली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !