जळगावात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार : चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा


जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीवरील सातपुडा शोरूमसमोर भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली होती. या प्रकरणी टँकर चालकावरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात चालकाविरोधात गुन्हा
मनोहर काशीनाथ पाटील (63, अयोध्या नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मनोहर पाटील हे स्कुटी (एम.एच.19 एक्स.8334) ने कुसुंबा गावाकडून अजिंठा चौफुलीकडे येत असताना सातपुडा शोरूमच्या समोर भरधाव टँकर क्रमांक (एम.एच.43 वाय. 8902) ने जोरदार धडक दिली. या धडकेत मनोहर काशिनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. या संदर्भात टँकर चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !