चाळीसगावात सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न


Attempt to break Central Bank ATM in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळील सेन्ट्रल बँकेचे एटीएम मशीनचे लॉक तोडून रोकड लांबवण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
रविवार, 1 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळील सेन्ट्रल बँकेचे एटीएम मशीनचे लॉक तोडून मशिनमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरीचा प्रयत्न केला. पुढील तपास नाईक मुकेश पाटील हे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !