नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांना सेवापूर्ती सोहळ्यात भावपूर्ण निरोप


भुसावळ : कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांना 33 वर्षाच्या यशस्वी प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती सोहळ्यात साश्रू नयनांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.हृदयस्पर्शी गुणगौरव समारंभ नुकताच संस्थाध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या वाचन कक्षात झाला.

यांची विचार मंचावर उपस्थिती
याप्रसंगी चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमारजी नाहाटा, संचालक मंडळातील सन्माननीय सदस्य श्यामजी दरगड, अब्दुल भारमल, पी.व्ही.पाटील, निळकंठ भारंबे, सुरेश हंबर्डीकर, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही पाटील, डॉ.एन.ई.भंगाळे, डॉ.ए.डी.गोस्वामी, वाय.एम.पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध संघटनांनतर्फे वायकोळे यांचा सन्मान
राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित कुशल प्रशासक, डॉ मीनाक्षी वायकोळे यांचा, ताप्ती एज्युकेशन संस्था, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि विविध विभाग, एन.मुक्टो, माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि प्रशासकीय विविध पैलूंचा उलगडा करणारी अतिशय हृदयस्पर्शी मनोगत उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे , प्रा.साळुंखे, उपप्राचार्य वाय एम पाटील. कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे, प्राचार्य मीना कटलर, यांनी व्यक्त केले. प्रा.उत्तम सुरवाडे यांनी मनोगतात केलेला गुणगौरव सर्वांच्या थेट काळजाला भिडणारा होता. संपूर्ण सभागृह भारावून गेले.त्या क्षणी अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. डॉ.व्ही.डी.पाटील यांचा संदेश याप्रसंगी वाचून दाखवण्यात आला

प्राचार्य झाल्या भावूक
सत्काराला उत्तर देताना अतिशय मार्मिक आणि भावपूर्ण शब्दात आपल्या कारकिर्दीचा लेखाजोखा प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी मांडला. प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळताना ज्यांनी मार्गदर्शन सहकार्य केले .त्या सार्‍यांचं ऋण व्यक्त करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बोलताना अनेक वेळा त्या भाऊक झाल्या. त्यांचा कंठ दाटून आला होता. अक्षरशःशब्द ओठांवर येत नव्हते. अध्यक्ष समारोप डॉ.मोहन फालक यांनी केला. संस्थेच्या एखाद्या प्राचार्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बोलताना अश्रूंना वाट करून देतात. असं दुर्मिळ चित्र त्या सभागृहाने त्या दिवशी अनुभवल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी करीत आभारही मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !