चाळीसगावातून पशूधनाची चोरी : पशूपालक संकटात


Livestock Theft from Chalisgaon : Livestock breeders in trouble चाळीसगाव : घराच्या मागील गोठ्यात बांधलेल्या बारा गायींमधून दोन गायी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना शहरातील धुळे रोडवर घडली. पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरीमुळे शेतकरी भयभीत
चाळीसगाव शहरातील धुळे रोड परीसरातील संतोष निंबा घटी हे वरील ठिकाणी परीवारासह वास्तव्याला आहे. दुग्ध व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. तत्पूर्वी घटी यांनी घराच्या पाठीमागे जणावरांसाठी एक गोठा बांधला असून त्यात एकूण 12 बारा गायी बांधण्यात आल्या होत्या मात्र 25 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून तर 26 डिसेंबर -2022 रोजी सकाळी 3 वाजेच्या दरम्यान अज्ञाताने 25 हजार रुपये किं.ची जर्सी जातीची गाय व 20 हजार रुपये किं.ची लाल पांढर्‍या रंगाची जर्सी जातीची गाय अशा 45 हजार रुपये किंमतीच्या गायी लांबवल्या. शंतनु संतोष घटी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !