प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात 27 व 28 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन

भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 27 व 28 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील, डॉ.जे.वि.धनविज तसेच पर्यवेक्षक राजेंद्र भदाणे, स्नेहसंमेलन प्रमुख दीपाली पाटील, डॉ.सरोज शुकला, स्नेहसंमेलन सचिव निकिता पाचपांडे, हर्षदा चौधरी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मैदानी स्पर्धांचे 27 ला उद्घाटन
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 रोजी सकाळी नऊ वाजता मैदानी स्पर्धांचे उद्घाटन संस्था सदस्य सुनील कोटेचा यांच्याहस्ते होईल. प्रमुख पाहुणे राधेश्याम लाहोटी, डॉ.संदीप जैन, सामाजिक कार्यकर्त्या प्रशांत अग्रवाल, माधुरी कोटेचा यांची उपस्थिती होती. सकाळी दहा वाजता स्नेहसंमेलन उद्घाटन, पदम आर्ट गॅलरीचे उद्घाटन, विविध स्पर्धेचे उद्घाटन सचिव संजय सुराणा यांच्या हस्ते होईल. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष पद्मा मोतीलाल कोटेचा, सुगनचंद सुराणा, मूलचंद लाहोटी यांच्या उपस्थितीत होईल.दुपारी दीड ते साडेपाच यावेळेस सर्वांच्याच आवडीचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या कार्सक्रमाचे उद्घाटन महावीर सिव्हिल इंजिनिअरींग अॅण्ड सर्व्हिसेस प्रा.लि.जळगावच्या संचालिका ज्योती कोटेचा यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ललिता चोरडिया, नीरंजना शहा उपस्थित राहतील.
शनिवारी पारीतोषिक वितरण
शनिवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता संस्थाध्यक्ष पद्मा मोतीलाल कोटेचा यांच्या अध्यक्षतेखाली पारीतोषिक वितरण समारंभ होईल.
याप्रसंगी मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा (बहादरपूर) आणि अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी शेलापागोटे आणि विद्यार्थिनीसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम होईल.कार्यक्रमाचा आस्वाद भुसावळ परीसरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.


