माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या पक्षांतराने रावेर तालुक्यात बदलणार समीकरणे !

रावेर : माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाच्या राज्याच्या नेतृत्वावार नाराज असून त्यांनी पक्षांतर करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातदेखील भाजपामधील त्यांचे खंदे समर्थक नाथाभाऊंच्या निर्णयानंतर काय निर्णय घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. भाजपा पक्षाने नाथाभाऊंना टिकीट नाकारल्याने स्वत:च्या जिवाची परवा न करणारे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनिधी रावेर तालुक्यात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षांतराचा भूकंप केल्यास त्याचा रावेर तालुका भाजपामध्ये किती खळबळ माजवतो याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेने लक्ष लागले आहे.
नाथाभाऊंनी मानणारा मोठा वर्ग
सद्यस्थितीत रावेर तालुक्यातील आमदार सोडले तर सर्व सर्वत्र भाजपा सरस आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते नाथाभाऊंनी निर्णय घेतल्यास मुक्ताईनगर नंतर सर्वात जास्त त्यांना मानणारा वर्ग रावेर-यावल विधासभा क्षेत्रात आहे.
रावेर तालुक्यात भाजपाकडे सावद्याची नगर पालिका, रावेर पंचायत समिती, जिल्हा परीषदेचे चार सदस्य, इतर मोठ्या संस्था सध्या भाजपाकडे आहे.सोबत कार्यकर्त्यांची मोठी फौज भाजपाकडे असल्याने भाजपाची मोठी ताकद तालुक्यात आहेत शिवाय नाथाभाऊंना मानणारा मोठा वर्गदेखील आहे.
निवडणुका तोंडावर
रावेर पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडणूक तोंडावर असून सुमारे आठ महिन्यांनी तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. वर्षभरात रावेर कृषी उपन्न बाजार समितिची निवडणूक आहे यामुळे नाथाभाऊं यांनी काही वेगळा निर्णय घेतल्यास याचा फटका कुठे बसेल व सोबत कोण येईल? हे भाजपा व नाथाभाऊ यांच्यासाठी येणारा काळच ठरविणार आहे.
खडसेंना मानणारा आहे मोठा गट
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मानणारा एक मोठा गट रावेर-यावल विधानसभा क्षेत्रात आहे. खडसे हे सद्यस्थितीत भाजपाच्या राज्य नेतृत्वावर कमालीचे नाराज असल्याने त्यांना मानणारा गटदेखील या तालुक्यांमध्ये आहे.


