हद्दपारीचे उल्लंघण तरीही पोलिसांशी हुज्जत घालत केली धक्काबुक्की : चाळीसगावातील प्रकार
Violation of Deportation still tussled with Police : Chalisgaon Case चाळीसगाव : हद्दपार असतानाही पोलिस पकडण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी पोलिसांनाच दमदाटी करीत हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात संशयीत अक्षय भानुदास पाटील (25, रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांशी घातली हुज्जत
अक्षय पाटील हा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या चाळीसगावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.कॉ दीपक चौधरी हे चाळीसगाव बसस्टॅण्डच्या मागील बाजूस एका टपरीजवळ गेले असता तेथे अक्षय पाटील हा आढळून आला. पोलिस चौधरी हे अक्षयला ताब्यात घेण्यास गेले असता त्याने हुज्जत घालून, तुमच्याकडून माझे जे होईल ते करुन घ्या. मी पोलीस स्टेशनला येणार नाही, असे म्हणून त्यांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू पो.कॉ चौधरी हात न सोडल्यामुळे अक्षयने त्यांच्यासोबत धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अक्षय पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.


