वरणगाव माळी समाजातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन
वरणगाव : माळी समाजातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त श्री संत सावता महाराज माळी समाज मंदिरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष संजय माळी, शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी (आपला माणूस), जे. बी. माळी, लहू माळी, कृष्णा माळी, गंभीर माळी, राजाराम माळी यांची उपस्थिती होती.