भुसावळातील हिंदी महाविद्यालयात सावित्री फुले जयंती उत्साहात
भुसावळ : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर रमेश जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
प्राचार्यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाची व कार्याची सविस्तर माहिती देत ,स्त्रीला स्वाभिमानाने शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले असेही सांगितले. अशा त्यागमय मूर्तीला आम्ही सर्वजण नमन करतो. तसेच डॉ.त्रिवेदी ह्यांनी स्त्रीचा सन्मान करावा असे सांगितले व सावित्री बाई फुले यांची जन्म जयंती आम्हाला सतत प्रेरणा देते की शिक्षण हा माझा अधिकार आहे , असे मत प्रा. ज्योती ओसवाल यांनी व्यत केले सर्व प्राध्यापक गण यांनीही पुष्प अर्पण केले. सूत्रसंचालन डॉ.पूनम त्रिवेदी व आभार प्रा. ज्योती ओस्तवाल यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
