गोदावरी महाविद्यालयाजवळ भीषण अपघात : जळगावातील विवाहिता जागीच ठार


Horrific accident near Godavari College: Jalgaon married woman killed on the spot जळगाव : भरधाव दोन दुचाकींचा अपघात झाल्यानंतर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या विवाहित महिलेला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना नशिराबादजवळील गोदावरी हॉस्पीटलनजीक मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याची आई जुबेदा बेग अल्ताफ बेग (48, समता नगर, जळगाव) ही विवाहिता जागीच ठार झाली आहे.साखरपुड्याहून परतताना अपघात
जुबेदा बेग अल्ताफ बेग ह्या समता नगरात पती व दोन मुलांसह वास्तव्यास होत्या. मंगळवार, 3 जानेवारी रोजी सकाळी जुबेदा बेग या सावदा, ता. रावेर येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलगा कमिन बेग अल्ताफ बेग याच्या सोबत दुचाकीने गेल्या होत्या. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी जुबेदा बेग या मुलासह दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाले. सायंकाळी वसख वाजेच्या सुमारास गोदावरील हॉस्पिटलच्या पुढे नशिराबाद रोडवर समोरून येणार्‍या दुचाकीने धडक दिली. या अपघातात जुबेदा बेग ह्या रोडवर पडल्या, तितक्यात मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकच्या चाकाखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा कमिन बेग हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला जवळच असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

नशिराबाद पोलिसांची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !