धावण्याच्या शर्यतीत यश रुपेश मोरे याची उत्तुंग भरारी
भुसावळ : भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले .ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या यश रुपेश मोरे याने धावण्याच्या शर्यतीत उत्तम कामगिरी बजावत द्वितीय क्रमांक पटकावला .ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर यांच्या शुभहस्ते यश रुपेश मोरे यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन नुकतेच गौरवण्यात आले. फुटबॉलची आवड असणाऱ्या यशच्या या कामगिरीबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी ,मुख्याध्यापिका नीना कटलर , ताप्ती पब्लिक स्कुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालकसंघ, यशचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी ,सर्व पत्रकार बांधव यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
