आठ वर्षांपूर्वी अपमानास्पद वागणूक दिल्याने खून : दोघे आरोपी अखेर जाळ्यात


Murder due to humiliating behavior eight years ago: Two accused finally in the net ठाणे : आठ वर्षांपूर्वी मारहाण करीत दिलेल्या अपमानास्पद वागणूकीतून एकाचा खून केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली. कशेळीतील माथाडी कामगारांचा ठेकेदार असलेल्या गणेश कोकाटेची गोळीबार करुन संशयीत धनराज तोडणकर (33, रा. इंदिरानगर, ठाणे) व संदीपकुमार कनोजिया (27, रा. सुलतानपुर, उत्तरप्रदेश) यांनी हत्या केली. दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे.

डिसेंबर महिन्यात गोळी झाडून केली हत्या
भिवंडीतील कशेळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ कोकाटे याच्यावर मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना 8 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त जयजित सिंह आणि सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनीही यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते. ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पाच पथकांसह नारपोली पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !