दीपनगर प्रकल्पासाठीच्या कोळश्याची धावत्या ट्रकमधून चोरी : अज्ञाताविरोधात गुन्हा
Theft of Coal for Deep Nagar Project from Running Truck : Crime Against Unknown भुसावळ : दीपनगर प्रकल्पासाठी कोळसा वाहून नेणार्या ट्रकमधून कोळश्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
धावत्या ट्रकमधून कोळश्याची चोरी
दीपनगर प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता महेशकुमार मधुकर पागवाड (45, दीपनगर कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, 31 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता दीपनगर प्रायव्हेट लाईनवर गोंदिया कॅबीनकडून दीपनगर औष्णिक केंद्राच्या यार्डात येणार्या ट्रकमधून अज्ञात इसम हे कोळश्याची चोरी करताना आढळून आले. संशयीतांनी 22 हजार 220 रुपये किंमतीचा कोळसा गोण्यांमध्ये भरून फेकला व काही गोण्या कोळसा घेवून पळ काढला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.


