साकेगावात दोन बंद घरे फोडली : 79 हजारांचा मुद्देमाल लंपास


Two closed houses were broken into in Sakegaon: goods worth 79,000 were looted भुसावळ : तालुक्यातील साकेगाव शिवारातील दोन बंद घरांमधून चोरट्यांनी 79 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाचवेळी दोन ठिकाणी चोर्‍या
साकेगाव शिवारातील खालसा हॉटेलमागे शेत गट क्रमांक 233 अ मध्ये पितांबर सुकलाल हिवरकर (37) हे वास्तव्यास आहेत. हिवरकर घरी नसल्याची संधी चोरट्यांनी 1 ते 2 जानेवारी रोजी साधत घरातून 35 हजारांची रोकड, 24 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे, सात हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच समाधान कुंभार यांच्या घरातून नऊ हजारांची रोकड, दोन हजारांच्या चांदीच्या पाटल्या, दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून एकूण 79 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात हिवरकर यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोई करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !