न्हावेनजीक बस चालकाच्या डोक्यात घातला दगड : एकाविरोधात गुन्हा
Stone thrown on bus driver’s head near Nhave : Crime Against One चाळीसगाव : न्हावे गावानजीक बस चालकाच्या डोक्यात दगड मारण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीताविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील बस चालक संजय दत्तात्रय सरोदे (53) हे चाळीसगावकडून वाडेगावी तरवाडे-न्हावेमार्गे बस (क्र. एम.एच.20 बीएल 0368) प्रवाशांना घेऊन जात असताना न्हावे गावातील बस स्थानकाजवळ त्यांनी बस हळू केल्यानंतर पाठीमागून एक दुचाकीस्वार आला व त्याने बसचा दरवाजा उघडून चालकाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत चालक संजय सरोदे यांना गंभीर दुखापत झाली. हा प्रकार मंगळवार, 3 जानेवारी रोजी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास घडला. बस चालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या जाबजबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नामे शरद प्रकाश पाटील (तरवाडे, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.


