धावत्या रेल्वेखाली आलेल्या कजगावातील प्रौढाचा मृत्यू : अखेर पटली ओळख


Death of an adult in Kajgaon who was hit by a running train : Finally Identified पाचोरा : धावत्या रेल्वेखाली आलेल्या मयताची ओळख अखेर पटली आहे. मयत कजगाव येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाचोरा तालुक्यातील कजगाव रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू झाल्याने ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अखेर पटली ओळख
पाचोरा तालुक्यातील कजगाव रेल्वे स्थानकानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 346 / 11 / 13 दरम्यान एका अनोळखी इसमाचा धावत्या रेल्वेखाली सापडुन मृत्यू झालेल्या घटना सोमवार, 2 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. दुर्दैवी मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटली असुन पंडित न्हानू कांबळे (57) असे आहे. ते कजगाव येथील रहिवासी आहेत. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार मधुसूदन भावसार यांनी शहानशा करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. मयत पंडित कांबळे यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, चार मुले व मुलगी असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !