भालशीव पिंप्रीच्या तरुणाचा तापीपात्रात मासेमारीदरम्यान मृत्यू


Youth of Bhalshiv Pimpri dies while fishing in Tapipatra यावल : तापी पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या यावल तालुक्यातील भालशिव पिंप्री गावातील तरुणाचा मृत्यू झाला. गुलाब बारकू भील (30) असे मयताचे नाव आहे. मंगळवार, 3 रोजी सायंकाळी ही घटना घडली.

पाण्यात बुडाल्याने मृत्यू
गुलाब बारकु भील (30, भालशिव पिंप्री, ता.यावल) हा तरुण मंगळवार, 3 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आपला भाऊ संतोष बारकु भिल याच्यासह तापी नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. यात संतोष भिल हा रात्री आपल्या घरी आला मात्र गुलाब भिल हा त्याचा मोठा भाऊ रात्री उशीरा पर्यंत घरी आला नाही. कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला असता बुधवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह तरंगतांना दिसुन आला. यावेळी मयत गुलाब भिलचा मृतदेह गावातील लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
या संदर्भात मयताचा भाऊ संतोष बारकु भिल याने खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष सूर्यवंशी हे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !