भुसावळात मानवता सेवा मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 25 तृतीयपंथीयांची तपासणी
भुसावळ : शहरातील संजीवनी ब्लड डोनर ग्रुपचे सागर विसपुते यांनी मानवसेवा अंतर्गत मोफत तृतीयपंथीयांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. शहरातील एम.के.इंडस्ट्रीज, मंगल शारदा कॉलनीजवळ आयोजित शिबिराचा 25 तृतीयपंथीयांनी लाभ घेतला.
विविध आजारांची मोफत तपासणी
या शिबिरात श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.महेश पांगळे, डॉ.सय्यद यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील शुगर, गरजू पेशंटचा ईसीजी काढण्यात येऊन मार्गदर्शन केले. नेत्रम हॉस्पिटलचे सुनील मेश्राम यांनी नेत्र तपासणी केली. यशस्वीतेसाठी संजीवनी ब्लड डोनर ग्रुपचे सागर विसपुते आणि सदस्यांनी परीश्रम घेतले.
