ईडीची मोठी कारवाई ः माजी मंत्री अनिल परबांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त
मुंबई : सेनेच्या ठाकरे गटातील नेते अनिल परब यांची ईडीने 10.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याने परबांना मोठा धक्का बसला आहे. परब यांनी मात्र कारवाईशी आपला संबंध नसल्याचे सांगत तसे काही असल्यास न्यायालयात दाद मागू, असे सांगितले आहे.
पर्यावरण मंत्रालयाच्या तक्रारीची दखल
अनिल परब यांचे दापोलीत रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट आणि त्याच्या आसपासच्या 42 गुंठे जमिनीचाही समावेश आहे. एकूण 10.20 कोटी रुपयांची ही संपत्ती असल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केलेली असली तरीही मुळ तक्रार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी अनिल परब यांची प्रतिक्रिया विचारली असता, आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून केवळ बदनामीसाठी नाव जोडण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
