भुसावळात अवैध वाळू वाहतूक : दोघांविरोधात गुन्हा
Illegal sand transport in Bhusawal : Crime against two भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी चालकासह दोघत्तंविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू येत असतानाही महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल पथकाने यावल रस्त्यावर अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली तर डंपरही तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आला आहे.
दोघांविरोधात गुन्हा
महसूल कर्मचारी फिरोज खान सिकंदर खान (43, गुंजाळ कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 3 रोजी आठ वाजेच्या सुमारास डंपर क्रमांंक (जी.जे.03 एएक्स. 5263) मधून वाळूची विना परवाना वाहतूक होत असताना पथकाने कारवाई करीत वाहन जप्त केले. या प्रकरणी चालक दिनेश सोमा भील (21, अकलूद) व गोविंदा पंढरीनाथ सपकाळे (अंजाळे) यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.


