भुसावळात बांधकाम ठेकेदाराला शिविगाळ : व्यावसायीकाविरोधात गुन्हा
Abusing construction contractor in Bhusawal : Crime against businessmen भुसावळ : बांधकामाच्या प्लॅस्टरवरून झालेल्या वादानंतर बांधकाम ठेकेदाराला शिविगाळ करीत धमकी देण्यात आली तसेच संबंधिताचे साहित्य जप्त केल्याप्रकरणी भुसावळातील प्रतिष्ठीत व्यावसायीक गुरूदीपसिंग केशरसिंग छाबडा (63, तापी नगर, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार शेख साजीद शेख साबीर (35, बिस्मिल्ला नगर, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसा छाबडा यांच्या साकरी फाट्यावरील जनता फर्निचर येथे बांधकाम सुरू असताना प्लॅस्टर करण्यावरून झालेल्या वादानंतर छाबडा यांनी बांधकामाचे साहित्य परत केले नाही तसेच मॉडर्न रोडवरील जनता फर्निचरवर हिशोब करण्यासाठी 11 रोजी दुपारी 12 वाजता आल्यानंतर छाबडा यांनी शिविगाळ करीत धमकी दिली. तपास हवालदार गोपाळ गव्हाळे करीत आहेत. दरम्यान, छाबडा यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसांनी सीआरपीसी 107 अन्वये कारवाई केली आहे.


