भुसावळात पत्रकाराला शिविगाळ : किन्ही उपसरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा


भुसावळ : तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायतीचे वृत्त दैनिकात प्रसिद्ध केल्याचा राग आल्याने किन्ही ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप उर्फ पीना शामराव कोळी व संजय विश्‍वनाथ येवले (किन्ही, ता.भुसावळ) यांनी पत्रकार अमोल जवानसिंग पाटील यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना 21 रोजी दुपारी चार वाजता भुसावळातील शिवाजी कॉम्प्लेक्स परीसरात घडली. या प्रकरणी पत्रकार अमोल पाटील यांच्या तक्रारीनुसार दोघा संशयीत आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.