राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात वर्‍हाडींना झाली विषबाधा : औरंगाबादमधील प्रकार


Varhadis poisoned at NCP leader’s son’s wedding : Case in Aurangabad औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यानिमित्त बुधवारी रात्री मदनी चौकात आयोजित जेवणानंतर अनेक वर्‍हाडींना विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वर्‍हाडींचा आकडा मोठा असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्वीटडिश खार्ल्याीरीक्ष उलट्या, मळमळ, जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वर्‍हाडींना घाटी रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना रात्रीच सुटी देण्यात आली.

22 वर्‍हाडींना विषबाधा
लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने प्रकृती बिघडून 22 जण घाटी रुग्णालयात तर 49 जण एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. काहींना रात्रीच उपचार करून सुटी देण्यात आली. सध्या घाटी रुग्णालयात एकावर तर एमजीएम रुग्णालयात 14 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरु असलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. जेवणानंतर स्वीटडिश खाल्यानंतर त्रास सुरु झाल्याचे बाधीतांनी सांगितले. दरम्यान, याबाबत अनेक अफवा सकाळपासून शहरात पसरल्या होत्या. चारशे ते सातशे जणांना विषबाधा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, कदीर मौलाना यांनी यावर स्पष्टीकरण देत बाधितांचा आकडा फुगवून सांगण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच उपचार सुरु असलेल्यांचा आकडा किरकोळ असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !