अहिरवाडीतील विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


 

मध्यरात्री विवाहितेच्या घरात प्रवेश करीत केला विनयभंग



रावेर : तालुक्यातील अहिरवाडी येथे विवाहितेचा पती बाहेरगावी यात्रा पाहण्यासाठी गेल्यानंतर महिला घरात एकटी असल्याची पाहत एकाने मध्यरात्री घरात अनधिकृत प्रवेश करीत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा
पीडीतेच्या तक्रारीनुसार त्यांचे पती यात्रा बघायला बाहेरगावी गेला गेल्यानंतर 30 वर्षीय महिला घरात मुलांसोबत एकटी असल्याची संधी बघून आरोपी कैलास अटकाळे याने अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. आरोपीविरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक नितीन डांबरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !