अमळनेर शहरातील कुविख्यात दादू निकुंभवर एमपीडीएची कारवाई


MPDA action on the notorious Dadu Nikumbh in Amalner city अमळनेर : शहरातील पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (20, पारधीवाडा सुभाष चौक, अमळनेर) याच्यावर एमपीडीपी (स्थानबद्ध) ची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

11 गुन्हे दाखल
दादू निकुंभविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अ‍ॅक्ट, दुखापत आदी प्रकारचे तब्बल 11 गुन्हे अमळनेर पोलिसात दाखल असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिली.



 

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संशयीतावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, जळगाव व जिल्हाधिकारी , जळगाव यांच्या आदेशाने मंजूर करवून त्यास MPDA कायद्याअंतर्गत नाशिक सेन्ट्रल जेल येथे स्थानबद्धतेसाठी पाठविण्यात आले आहे.
ही स्थानबद्धता ही एक वर्ष कालावधीसाठी असेल.
गुन्हेगारावर  कठोर कारवाई झाल्याने अमळनेरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे व पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या मोठ्या व परिणामकारक कारवाईमुळे अमळनेरमधील गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरली आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य टिममधील किशोर पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे यांनी तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, प्रमोद पाटील, जितेंद्र निकुंबे, कमलेश बाविस्कर यांनीदेखील सहकार्य केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !