‘इथे कुणीही नाही सिंघम’ : देवेन भारती यांच्या ट्विटची पोलिस वर्तुळात जोरदार चर्चा


‘There is no one here Singham’: Deven Bharti’s tweet is hotly debated in police circles मुंबई : राज्य सरकारने नव्यानेच आयपीएस देवेन भारती यांच्यासाठी ुंमबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदाची निर्मिती केली आहे. भारती यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. मुंबई पोलीस ही एक टीम आहे, इथे कोणताही सिंघम नाही. म्हणजे स्पेशल सीपींनी स्पष्ट केले की, प्रत्यक्षात मुंबई पोलिसांची ओळख सिंघम या नावाने नव्हे तर टीम आणि कामावरून होते. भारती यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे.

कोण आहेत देवेन भारती?
54 वर्षीय देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळ बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील आहे. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. मुंबई पोलिसांचे पहिले विशेष पोलिस आयुक्त म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा), पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे) हे विशेष पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करतील.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !