भरधाव रुग्णवाहिकेने उडवले : कुसुंब्यातील विवाहिता ठार


Blown up by rush ambulance : Married woman killed in Kusumba जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील विवाहिता संगीता कैलास पाटील (48) यांना भरधाव रुग्णवाहिकेने उडवल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवार, 6 रोजी हा अपघात घडला.

भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेने मृत्यू
कुसुंबा येथे संगीता पाटील या आपल्या पती कैलास लक्ष्मण पाटील, सासू इंदुबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह वास्तव्यास होत्या. गेल्या आठ दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी असल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याने संगीताबाई पाटील या शुक्रवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता सासू इंदुबाई यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्यासाठी निघाल्या होत्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधाव वेगाने येणार्‍या रुग्णवाहिका क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.7091) ने जोरदार धडक दिल्याने संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. ही घटना घडल्यानंतरच त्याच रुग्णवाहिकेतून संगीताबाई पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !