जळगावच्या रायसोनी नगरात एकाची आत्महत्या
Suicide of one in Raisoni Nagar of Jalgaon जळगाव : शहरातील रायसोनी नगरातील मुकेश सुभाष सोनार (40) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गळफास घेत केली आत्महत्या
जळगाव शहरातील रायसोनी नगरात मुकेश सोनार हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या काही दिवसापासून मुकेश याची पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. मुकेश हा हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. बुधवारी त्याची आई कल्पनाबाई सोनार आणि वडील सुभाष नारायण सोनार हे कामाच्या निमित्ताने गावात आले होते. त्यावेळी घरात मुकेश हा घरात एकटाच होता. यादरम्यान मुकेश याने दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.


आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दुपारी चार वाजता तरुणाचे आईवडील हे घरी आले मात्र दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. घरातील लोकांनी शेजारचांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी रेवानंद साळुंखे करीत आहेत.
