रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : धुक्यामुळे सहा तर हावडामधील ब्लॉकने पाच रेल्वे गाड्या लेट


Attention Railway passengers: Due to fog, six and five trains were delayed due to block in Howrah भुसावळ : उत्तर भारतात दिवसेंदिवस वाढत असलेल्या धुके व थंडीमुळे रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. उत्तर भारतातून येणार्‍या सहा तर हावडा येथे रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे त्या भागातून येणार्‍या पाच रेल्वे गाड्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावत आहे. लेट धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना स्थानकावर थांबून राहावे लागत आहे.

कडाक्याच्या थंडीचा परीणाम
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे.यामुळे थंडी व धुक्याचा फटका हा रेल्वे गाड्यांना बसत आहे. धुक्यामळे गाड्या कमी वेगात चालिवल्या जात आहे. यामुळे भुसावळकडे येणार्‍या रेल्वे गाड्यांना येथपर्यत येण्यास वेळ लागत आहे. गुरूवारी उत्तर भारतातून ले येणार्‍या गाड्यामध्ये पुष्पक एक्स्प्रेस 3 तास, कनार्टक एक्स्प्रेस 4, पवन एक्स्प्रेस 2, पठाणकोट एक्स्प्रेस 5, पंजाब मेल 2 , गोहाटी एक्स्प्रेस 2 तर हावडा विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉकचा फटका हा गितांजली एक्स्प्रेस 2, आझाद हिंद एक्स्प्रेस 4, पुरी अमदाबाद एक्स्प्रेस 2, हावडा अमदाबाद एक्स्प्रेस 4, हावडा मेल 4 या गाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या थंडी व धुक्यामळे रेल्वे गाड्यांना हा फटका बसत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !