खासदार संजय राऊतांच्या पुन्हा वाढल्या अडचणी : अजामीनपात्र वॉरंट जारी


 

खासदार संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : शिवडी न्यायालयान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात 24 जानेवारी सुनावणी होणार त्यानंतर राऊंतावरील पुढील कारवाईचा निर्णय स्पष्ट होणार आहे.

शिवडी न्यायालयाचा निर्णय
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीच्या दाव्यासंदर्भात शिवडी न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामध्ये संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी आरोप केला होता की, शौचालय घोटाळा झाला. 100 कोटींच्या या घोटाळ्यात सोमय्या यांचे नाव घेण्यात आले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावर मानहानीचा दावा केला आहे. त्याप्रकरणी आता न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !