लाच भोवली : नाशिक महापालिकेचा लाचखोर प्रभारी अधीक्षकासह शिपाई जाळ्यात


Bribery: Bribery of Nashik Municipal Corporation along with superintendent in charge  नाशिक : हॉकर्स झोनमध्ये बायोमेट्रिक नोंदणी करण्यासह त्याची पावती देण्यासाठी चहा विक्रेत्याकडे पाच हजारांची लाच मागून तडजोडीअंती एक हजार आठशे रुपये स्वीकारणार्‍या नाशिक महापालिकेतील प्रभारी कार्यालय अधीक्षक राजू उत्तम वाघ (48) व शिपाई प्रवीण अर्जुन इंगळे (42) यांना नाशिक एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

लाचखोरांमध्ये कारवाईने खळबळ
नाशिक शहरात चहा टपरी चालविणार्‍याने हॉकर्स झोन मध्ये बायोमेट्रिक नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी आणि त्याची पावती देण्यासाठी संबंधित चहा विक्रेत्याकडे वाघ आणि इंगळे यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडी अंती 1800 रुपयांची लाच स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर यासंदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीचे पथकाने सापळा रचला. वाघ आणि इंगळे या दोघांनी महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन या कार्यालयाच्या मुख्य गेट जवळील पार्किंग मध्ये 1800 रुपयांची रक्कम स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने वाघ आणि इंगळे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !