स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापार्‍याला 16 लाखात गंडवले


16 lakhs cheated a merchant of Rawer in the name of supplying steel material जळगाव : स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापार्‍याला 16 लाख 27 हजार 800 रुपयांमध्ये गंडवण्यात आले. या प्रकरणी जळगावच्या सायबर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव सायबर पोलिसात गुन्हा
19 नोव्हेंबर 2022 रोजी मोहनलाल देवजी पटेल (रा. गजानन नगर, रावेर) यांचा मुलगा भावेश यांच्या मोबाईल नंबरवर 7738771861 या नंबरवरून करण रांका नाव सांगणार्‍या इसमाने त्याची स्वत:ची आयएसओ टॉपसइंडमेटलट्रेडर्स नावाची कंपनी असून बांधकामास लागणारे स्टील मटेरीयल पाठवण्यात येईल, असे सांगून विश्वास संपादन केला व त्यांना व्हॉट्सअपवर बनावट बनावट टॅक्स इनव्हाईस वरून बनावट ई बिल (ए-थ-ध इखङङ) पाठवून मो. 7738771861 करण रांका व 9519560878 ट्रकचालक राकेश शर्मा असे नाव सांगणार्‍या या दोघांनी वेळोवेळी ऑनलाईन एकूण 16 लाख 27 हजार 800 रुपये उकळले मात्र मटेरीयल न पाठवता आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी व्यापारी मोहनलाल पटेल यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !