चिनावलला माथेफिरूने केळीवर तणनाशक फवारल्याने तीन लाखांचे नुकसान
Three lakhs loss due to spraying of herbicide on banana by Mathefiru in Chinawa; चिनावल : चिनावल परीसरातील शेती पिकांचे नुकसान करण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होतच असल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यातच चिनावल गावातील एका केळी उत्पादकाच्यावर केळीवर विकृताने तणनाशक फवारणी केल्याने तीन लाखांचा आर्थिक फटका बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
चंद्रकांत चुडामण पाटील (55, रा.चिनावल, ता. रावेर) यांनी आपल्या चिनावल शिवारात कोचुर रस्त्याजवळ शेतगट नं 440 मध्ये केळी लावलेली आहे. अज्ञात माथेफिरूने 2 ते 6 जानेवारीच्या दरम्यान शेतातील 1500 ते 1600 केळी घडांवर तणनाशकाची फवारणी केल्याने केळी पिकाचे साधारण तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञात माथेफिरूविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद पाटील करीत आहेत.


