जळगावात महाविद्यालयीन तरुणींचा विनयभंग : दोघा तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


College girls molested in Jalgaon: Two youths were handcuffed by the police जळगाव : महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींचा पाठलाग करीत त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघा तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्यार्थिनींचा विनयभंग ः दोघांना अटक
पीडीत विद्यार्थिनी शुक्रवार, 6 जानेवारी रोजी एका कॉलेजच्या परीसरात असतांना फारुख खान युनुस खान (रा.उस्मानिया पार्क, जळगाव) आणि योगेश गजानन कुंवर (रा.वाघ, नगर, जळगाव) या दोघांनी पीडीत विद्यार्थिनीचा पाठलाग करीत अशल्लील हातवारे करीत जवळ बोलावले. यानंतर पिडीतेकडे तीचा मोबाईल नंबर मागत फोनवर बोलण्याचे सांगितले आणि तू माझ्याशी संबंध ठेव, असे बोलून विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोघां संशयीत आरोपींना अटक केली. तपास उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !