धक्कादायक ! विमानातील प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघूशंका ; आरोपीला अटक
Air India Flight peed Women Passenger Suspected Arrested नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी विमानातील महिला प्रवाशाच्या अंगावर लघूशंका करणार्या शंकर मिश्राला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली होती. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार न्यूयॉर्कहून दिल्लीला येणार्या एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी करणार्या पुरुषाविरुद्ध लुक आउट सर्कुलर जारी केले होते. याशिवाय दिल्ली पोलिसांचे एक पथक आरोपी शंकर मिश्रा यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मुंबईत पोहोचले असून, आरोपीची माहिती मिळवून त्यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी, एअर इंडियाने आपल्या स्तरावर कारवाई करत आरोपीवर 30 दिवसांची प्रवास बंदी घातली आहे.
त्या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल
एअर इंडियाने केलेल्या तक्रारीच्या आधारे धक्कादायक प्रकरणात आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 354, 509 आणि भारतीय विमान वाहतूक कायद्याच्या कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला आणि आरोपी दोघेही दिल्लीत राहत नाहीत. महिलेच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.



