उद्योगपतीला एक कोटींच्या विमा रक्कम देण्यासाठी 12 लाखांची लाच भोवली : प्रादेशिक व्यवस्थापकासह दोघे जाळ्यात

विम्याची रक्कम देण्यासाठी मागितले होते पैसे : उद्योगपतीकडे मागितली लाच


12 lakhs bribe to give Rs 1 crore insurance to industrialist : Two arrested along with regional manager चंडीगड : न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक जे. के. मित्तल आणि सर्वेक्षक एन. एस. सिद्धू या दोघांना 12 लाखांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्याने खळबळ उडाली आहे. विमा दाव्याची एक कोटी रुपयांची रक्कम देण्यासाठी आरोपींनी ही लाच स्वीकारली.

लाच स्वीकारताच अटक
दिल्लीच्या राष्ट्रीय ग्राहक आयोगाने हिमाचल प्रदेशातील परवानू येथील एका उद्योगपतीला एक कोटी रुपयांचा विमा दावा देण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम देण्यासाठी न्यू इंडियन इन्शुरन्स कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक आणि सर्वेक्षक यांनी 12 टक्के म्हणजे 12 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत उद्योगपतीने सीबीआयकडे तक्रार दिल्यानंतर शिमल्यातील पोलिस अधीक्षक राजेश आणि पोलिस उपअधीक्षक बलबीर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने चंडीगडमध्ये सापळा रचला व प्रादेशिक व्यवस्थापक मित्तल आणि सर्वेक्षक सिद्धू यांना लाच घेताना अटक करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !