गुलाबराव पाटील स्पष्टच म्हणाले ; मुख्यमंत्र्यांनी दाढीवर हात फिरवला असता तर खासदार संजय राऊत आडवे पडले असते
Then Sanjay Raut would not have become an MP: Minister Gulabrao Patal’s remarks जळगाव : आपल्या करारी बाण्यासह स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखल्या जाणार्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टिकेचे बाण चालवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर फिरवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते. ते आडवे पडले असते,’ असे ते जळगावच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात म्हणाले.
ती 41 मते केवळ मुख्यमंत्र्यांमुळे
लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांसह विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते. आडवे झाले असते, संजय राऊत यांच्यावर यापूर्वी याच म्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मात्र स्पष्टच सूनावले आहे.

खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा
गुलाबराव म्हणाले की, मला खुर्चीपेक्षा माझा धर्म महत्त्वाचा आहे, आधी आम्ही हिंदू आहोत मग मंत्री असे म्हणतानाच खुर्ची आम्हाला देणारी जनता कधीही खुर्ची काढून घेऊ शकते, त्यामुळे आम्हाला केवळ धर्म महत्वाचा आहे. आमचा धर्म जरी महत्त्वाचा असला तरी आम्ही कुणाच्या धर्माला दुखावत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर मात्र आम्ही त्साला सोडणार नाही, असे म्हणतानाच इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा. असेही ते म्हणाले.