धुळ्यात हिट अ‍ॅण्ड रनचा थरार : मद्यपी टँकर चालकाने चार वाहनांना उडवले, दोघे जखमी


Thrill of hit and run in Dhule : Drunken tanker driver blows up four vehicles, two injured धुळे : मद्याच्या नशेत असलेल्या टँकर चालकाने शहरात चार वाहनांना उडवत दोघांना जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री उशिराने घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. शहरातील संतोषी माता मंदिर चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरवरील मद्यपी चालकाने मारोती ओमनीसह दुचाकी व रीक्षा धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी धाव घेत मद्यधूंद चालकाला अटक केली आहे.

चारही वाहनांचे मोठे नुकसान
शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास चाळीसगावकडून गुजरातच्या दिशेने रसायन घेवून निघालेला टँकर (जी.जे.16 ये.यू.5175) ने गरताडबारीपासून वाहनांना उडवण्यास सुरूवात केली. ओमनी (एम.एच.19 ए.ई.6833) चा चुराडा केल्यानंतर रीक्षा (एम.एच.18 बी.एच.0134) व नंतर दुचाकीसह अन्य वाहनाला उडवण्यात आले. अपघातानंतर वाहनधारकांमध्ये पळापळ झाली तर नागरीकांनी टँकर चालकाला ताब्यात घेत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा धुळे शहर पोलिसात राजेंद्रसिंग सकट याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व अधिकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.