तीन पत्ती व ड्रॅगन टायगर खेळाच्या माध्यमातून यावल तालुक्यातील तरुणाला 32 लाखांचा गंडा
32 lakhs to a young man from Yaval taluka through three leaf and dragon tiger game यावल : तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय तरुणाला दोन अज्ञात मोबाईल वरील फोन पे धारकांनी संगणमत करून त्याला तीन पत्ती व ड्रॅगन टायगर हे गेम खेळून त्याची तब्बल 32 लाख 50 हजार फसवणूक केली. या प्रकारानंतर तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दोन अज्ञात फोन पे धारक क्रमांक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फोन पे द्वारे गंडवले
यावल तालुक्यातील 22 वर्षीय व्यवसायीक तरूणास दोन फोन पे क्रमांक धारकांनी तीन पत्ती व ड्रॅगन टायगर हे गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित केले सदर तरुण गेम खेळत असतांना दोघा अज्ञातांनी त्याच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकुण 32 लाख 50 हजार रुपये ऑनलाइन लांबवले व त्याची फसवणूक केली तेव्हा सदर प्रकार तरुणांच्या निदर्शनास आल्याने त्याने यावल पोलीस स्टेशन गाठले यावल पोलीस ठाण्यात दोन अज्ञात फोन पे क्रमांक धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.


