अप-डाऊन मुंबई मार्गावर दहा गाड्या आज रद्द

डोंबिवली-कल्याणदरम्यान पॉवर ब्लॉक : अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट : अनेक गाड्यांच्या
भुसावळ : डोंबिवली व कल्याण दरम्यान असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावरील 400 मेट्रीक टनच्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम बुधवार, 25 रोजी करण्यात येत असून डोंबिवली व कल्याण दरम्यानच्या अप-डाऊन लाईनीवर बुधवारी सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनीवर पॉवर ब्लॉक घेण्यात येत असल्याने अप-डाऊन मार्गावरील प्रत्येकी पाच अशा दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचा मार्गात बदल तसेच काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
उपनगरीय सेवा आज ठप्प
डोंबिवली व कल्याण दरम्यान बुधवारी सकाळी 9.15 ते 1.45 दरम्यान वाहतूक बंद राहणार असून ब्लॉक दरम्यान कर्जत-कसारा दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार असून सीएसएमटी व ठाणे-डोंबिवली स्टेशन दरम्यान तसेच सीएसएमटी-दादर-कुर्ला-घाटकोपर व ठाण्यासाठी वेळेनुसार सेवा दिली जाणार आहे.
आज दहा गाड्या रद्द
बुधवारी अप 51154 भुसावल-सीएसएमटी पॅसेंजर, अप 22102 मनमाड-सीएसएमटी राज्यरानी एक्सप्रेस, अप 12110 मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस, अप 12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस, 12072 अप जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच डाऊन मार्गावरील डाऊन 12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस, डाऊन 12109 सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, डाऊन 22101 सीएसएमटी-मनमाड राज्यरानी एक्सप्रेस, डाऊन 12071 दादर-जालना जनशताब्दी एक्सप्रेस, डाऊन 51153 सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.
आज या गाड्यांच्या मार्गात बदल
11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस पुणे-दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे तर अप 12321 हावडा- सीएसएमटी कलकत्ता मेल एक्सप्रेस तसेच अप 13201 राजेंद्र नगर-एलटीटी जनता एक्सप्रेस जळगाव-वसई रोड-दिवा मार्गे डायव्हर्ट करण्यात आली आहे.
या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
अप 12140 नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रोडवर टर्मिनेट करण्यात येईल तर डाऊन 12139 सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रोडपासून चालवण्यात येणार आहे. दरम्यान, काही गाड्यांना विविध रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असून अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत.


