न्हावीतील सदगुरू स्मृती महोत्सवात पाच हजार रुग्णांची तपासणी

भागवत कथा श्रवणासाठी परीसरातील भाविकांची अलोट गर्दी
फैजपूर : जवळच असलेल्या न्हावी येथे सदगुरू स्मृती महोत्सवाच्या दुसर्या दिवशी बुधवार, 25 रोजी प्रथम सत्रामध्ये श्रीमद् भागवत कथेचे वक्ते सद्गुरू भक्तिप्रकाशदास यांनी सुंदर कथेचे विवेचन केले. या दिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वितरण, मोफत रक्त, लघवी तपासणी करण्यात आली. दुपारी एक वाजेपर्यंत पाच हजार रुग्णांची तपासणी करण्यात ात आली व त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन वडतालचे पू.देव स्वामी, वक्ताश्री भक्तिप्रकाश शास्त्री, महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्मप्रसादादसी, धर्मस्वरूप शास्त्री (भुसावल), डॉ.कुंदन फेगडे यांच्यासह संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
आरोग्य सेवेसाठी यांचे सहकार्य
या आरोग्य शिबिरात स्त्री रोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.सचिन राणे, नेत्र तज्ज्ञ डॉ.महेंद्र चौधरी, जनरल फिजीशीयन डॉ.दिलीप भरकर, डॉ.भरत महाजन, त्वचा रोग तज्ञ डॉ.पंकज नेहेते, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत जावळे, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.गौरव धांडे, दंत रोग तज्ज्ञ डॉ.पराग पाटील यांनी सेवा बजावली. महाजन मेडिकलचे नितीन महाजन व यांच्याकडून सर्व रुग्णांना मोफत औषधी वितरीत करण्यात आली. लक्ष्मी मेडिकलचे अनिल लढे यांच्यासह स्वामिनारायण गुरुकुलचे प्राचार्य संजय वाघुळदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समस्त उपस्थित होते.


