रावेर भाजपा तालुकाध्यक्षपदी राजन लासुरकर यांची सर्वानुमते निवड

रावेर : रावेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी खिरवळ येथील राजन लासुरकर यांची बुधवारी पक्षाच्या विशेष सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये भाजप पक्षाची बैठक झाली. यावेळी तालुकाध्यक्ष पदासाठी राजन लासुरकर (खिरवड), वासुदेव नरवाडे (विवरे), महेश चौधरी (दसनूर), दिलीप पाटील (रावेर), नितीन पाटील (रावेर), परमेश्वर सोनार (निंबोल), सी.एस.पाटील (रावेर), अॅड.प्रवीण पाचपोहे (रावेर), विकास अवसरमल (ऐनपूर), दुर्गादास पाटील (निंभोरा), पराग पाटील (सावदा), भास्कर बारी (रावेर), रवींद्र महाजन (कोचूर), उमेश महाजन (रावेर) आदींनी तालुकाध्यक्ष पदासाठी परीचय करून दिला .
यांची होती उपस्थिती
यावेळी बेटी-बचाव-बेटी-पढावचे संयोजक राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षा खडसे, माजी आमदार हरीभाऊ जावळे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, सभापती माधुरी नेमाडे, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणी प्रा.सुनील नेवे, जि.प.सदस्य कैलास सरोदे, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, महेश पाटील, विशाल पाटील, गोपाळ नेमाडे, संदीप सावळे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, भाजपा बूथ अध्यक्ष आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.
सर्वानुमते झाली निवड
रावेर तालुकाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस होती. तब्बल 14 जण या पदासाठी इच्छुक होते परंतु कोअर कमेटी ठरवेल तो निर्णय सर्वांना मान्य असल्याचे इच्छुकांनी सांगत तालुका कोअर कमेटीने एकमताने राजन लासुरकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी कोअर कमेटीत सभापती माधुरी नेमाडे यांना घेण्याचा विसर पडल्याने ते कमालीच्या नाराज झाल्या व होऊन त्यांनी आपली नाराजी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मांडली.


