पारोळ्यात नोकरावर चाकू हल्ला करणारा आरोपी जाळ्यात

पारोळा : शहरातील जुनी गणेश हॉटेलमध्ये 13 डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजता संशयीत आरोपी प्रवीण उर्फ बारकू नारायण हटकर याने मनोज कृष्णा हटकर झोपेत असताना त्याच्या मानेवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली होती तर दोघेही या हॉटेलमध्ये नोकर म्हणून कामाला होता. आरोपी प्रवीण हा गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता. संशयीत आरोपी पारोळा शहरातील कासोदा चौफुलीवर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल पंकज राठोड व विजय शिंदे आदींच्या पथकाने बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली. तपास हवालदार किशोर पाटील करीत आहेत.


