भुसावळात उद्या भाजपा शहराध्यक्ष पदाची निवड


भुसावळ : भाजपा शहरायक्ष निवडण्यासाठी गुरुवारी दुपारी चार वाजता लोणारी समाज मंगल कार्यालयात बैठक होत आहे. या बैठकीला माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपा जळगाव जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, निवडणूक अधिकारी हर्षल पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी रमाशंकर दुबे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भुसावळ शहरातील नगरसेवक, भाजपा सक्रिय सभासद, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच युवा मोर्चा, महिला आघाडी व सर्व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन हराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे व सरचिटणीस पवन बुंदेले यांनी केले आहे.


कॉपी करू नका.