भुसावळात नाताळचा उत्साह

नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रम : प्रार्थनेसाठी ख्रिश्चन बांधवांची अलोट गर्दी
भुसावळ : शहरातील विविध चर्चमध्ये बुधवारी नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांमध्ये अपूर्व उत्साह दिसून आला तर दिवसभर प्रार्थना करण्यासाठी गर्दी झाली होती. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चवर आकर्षक रोशनाई करण्यात आली होती. सणाच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चला रंग रंगोटी यापूर्वी करण्यात आली होती. शिवाय विविध कार्यक्रमांचे नियोजन करून चर्चही सजवण्यात आले होते.
भुसावळात नाताळचा उत्साह
शहरातील ख्रिश्चन बांधवांनी नवे कपडे परीधान करून शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना केली. ख्रिश्चन बांधवांनी सणाच्या पार्श्वभूमीवर घरांवर रोषणाई केली असून शहरातील चर्चमध्ये ख्रिसमचचे संदेश लिहिण्यात आले आहे. नाताळाच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेतही गर्दी झाली आहे. नाताळच्या ग्रिटींग कार्डसह अन्य साहित्य विक्रीस आले आहे. शहरात संत पॉल चर्च, अलायन्स मराठी चर्च, अलायन्स हिंदी, इग्लीश चर्च, एमानुएल मराठी अलायन्स चर्च, सेंट हार्ट चर्च आदी ठीकाणी ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थना केली.च डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील संत पॉल चर्चमध्ये 24 डिसेंबरला मिडनाईट सर्व्हीस व पवित्र सहभागिता तर बुधवारी सकाळी दहाला मराठी नाताळ सणाची भक्ती व पवित्र सहभागिताचे आयोजन केले होते. बुधवारी नाताळाच्या दिवशी सकाळी नऊला ख्रिस्ती जन्मोत्सव विशेष उपासना करण्यात आली. पास्टर स्वप्नील नाशिककर यांनी संदेश दिला.
शहरातील चर्चवर रोशनाई
अलायन्स हिदी आणि इंग्लीश चर्च सुध्दा शहरातील जुने चर्च असून चर्चलाही 100 वर्षांचा इतिहास आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हे चर्च असून चर्चला रंगरंगोटी करण्यात आली आहे. चर्चवर येथेही प्रार्थनेसाठी बुधवारी ख्रिश्चन बांधवांनी गर्दी झाली तर रेल्वे स्थानकाजवळ असलेले सेंट हार्ट चर्च हे शहरातील सर्वात जुने चर्च असून त्याची स्थापना ब्रिटीशकाळात करण्यात आली व 1874 मध्ये हे चर्च सुरू झाले आहे. सेंट हार्ट केथीलीक चर्च म्हणून याची ओळख आहे. नाताळाच्या पार्श्वभुमीवर चर्चचा परीसर सुशोभीत करण्यात आला.


