साकेगावात प्रीमियर लीगला सुरुवात
पहिल्या दिवशी जय महाराष्ट्र, मातृभूमी, एम्पायर मल्हार व जय बजरंग संघाने जिंकले सामने
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील महामार्गालगत असलेल्या जिल्हा परीषद शाळेच्या मैदानावर साकेगाव प्रीमियर लीग सीजन- 1 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जय महाराष्ट्र, मातृभूमी, एम्पायर मल्हार व जय बजरंग संघांनी आपले सामने जिंकले. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्याहस्ते हवेत फुगे उडवून व चेंडू टोलवून करण्यात आले.
यांची स्पर्धेप्रसंगी उपस्थिती
प्रसंगी ट्रामा केअर सेंटरचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माजी संजय पाटील, सरपंच पती विष्णू सोनवणे उपसरपंच आनंद ठाकरे, ग्राम विस्तार अधिकारी प्रीतम शिरपुरे, माजी सरपंच अनिल पाटील, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, डॉ.दीपक पाटील, रमजान पटेल यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अखेरच्या सामन्यात जय बजरंग संघ विजयी
स्पर्धेतील पहिला सामना जय महाराष्ट्र विरुद्ध योद्धा संघात झाला. सामना जय महाराष्ट्र संघाने 7 धावांनी जिंकला. दुसरा सामना मातृभूमी विरुद्ध वीर भगतसिंग या संघात झाला हा सामना मातृभूमी संघाने 26 धावांनी जिंकला. तिसरा सामना एम्पायर मल्हार विरुद्ध त्रिमूर्ती संघात झाला हा सामना एम्पायर मल्हार ने 9 विकेटस राखत जिंकला तर शेवटचा सामना जय बजरंग विरुद्ध नवनाथ संघात खेळला गेला हा सामना जय बजरंग संघाने 4 विकेट्सने जिंकला.
स्पर्धेत बक्षीसांचा वर्षाव
गावातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरीता मान्यवरण तर्फे विजेता- उपविजेता संघाला याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, फलंदाज, गोलंदाज, डिसीप्लीन टीम, सिक्स मारणार्या खेळाडूला रोख बक्षीस सह ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने युट्युबवर लाईव्ह दाखविण्यात येत आहे. मैदानावर स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिकांनी गर्दी केली. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन कमिटीचे सदस्य डॉ.दीपक पाटील, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, राहुल चौधरी, अजय चौधरी, रमजान पटेल, डॉ. कैलास ठाकरे, पप्पू पटेल, भूषणसिंग राजपूत, हेमंत वाघ, प्रवीण पाटील सचिन सोनवणे, नितीन पाटील, राहुल साळुंखे यांच्यासह खेळाडू प्रयत्नशील आहे. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळण्यात येत आहे.

